
अनेकदा बाहेरून अगदी पिवळाधमक दिसणारा आंबा आतून खराब निघतो. अशा वेळी आंबा फिरवून त्याच्या देठाकडचा भाग नीट तपासा. जर देठाच्या जागी खोल खड्डा दिसत असेल तर तो आंबा आतून सडलेला असू शकतो.
काही वेळा झाडावरून काढताना आंबे खाली पडतात. मार लागलेल्या आंब्यावर काळे डाग पडतात आणि ते आतून खराब होतात. अस्सल हापूसच्या देठाकडचा भाग हा किंचित खोलगट, पण सरळ रेषेत दिसणारा असतो.



























































