पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी, दिल्ली पोलिसांकडून ओडीशातील तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime Delivery Boy Arrested for Theft

एका दहशतवादी संघटनेशी संशयित संबंध असल्याच्या आरोपावरून, दिल्ली पोलिसांनी भुवनेश्वर येथील एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे, असे एका अधिकृत निवेदनात शनिवारी सांगण्यात आले. गंगा नगर परिसरातील ‘युनिट-६’ भागाचा रहिवासी असलेल्या आणि शेख इम्रान अशी ओळख पटलेल्या या आरोपीला, देशविरोधी कारवायांशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून, ओडिशा आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी अटक केली, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका आठवड्यापूर्वी राष्ट्रीय राजधानीत काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टची कसून तपासणी केली होती. त्यानंतर इम्रान पोलिसांच्या रडारवर आला, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पीटीआय ने दिलेल्या वृत्तानुसार, तो इंटरनेटद्वारे देशविरोधी प्रचार करत असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आलेला आहे. पाकिस्तानशी संबंध आणि देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. या संयुक्त कारवाईत भुवनेश्वर-कटक आयुक्तालय पोलिसांनीही सहकार्य केले.

तपास यंत्रणांच्या मते, इम्रान इंटरनेट माध्यमांद्वारे भारतविरोधी प्रचार करण्यात सामील होता. तो इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि सिग्नल यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या एका संशयास्पद नेटवर्कशी जोडलेला होता.