
इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या 2026 च्या महिला टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीने बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. आगामी स्पर्धेसाठी एकूण 81.83 कोटी रुपयांचे बक्षीस पूल जाहीर करण्यात आले असून, हे 2024 च्या तुलनेत 10 टक्क्यांनी जास्त आहे. यावेळच्या स्पर्धेत प्रथमच 12 संघ सहभागी होणार आहेत.
ICC ने जाहीर केलेल्या बक्षीस पूल नुसार, स्पर्धेतील विजेता संघ 21.84 कोटी रुपये घेऊन घरी जाईल, तर उपविजेत्या संघाला 10.92 कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघांवरही कोट्यवधींच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक संघ किमान 2.30 कोटी रुपयांची कमाई करेल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी सांगितले की, खेळाचा विस्तार करणे आणि महिला क्रिकेटला अधिक व्यावसायिक बनवणे हे आमचे ध्येय आहे. 12 संघांचा सहभाग हे महिला क्रिकेटच्या जागतिक लोकप्रियतेचे लक्षण आहे. या निर्णयामुळे जगभरातील महिला खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
Record prize money revealed for ICC Women’s #T20WorldCup 2026 https://t.co/g74ifqwa21
— ICC (@ICC) April 13, 2026
स्पर्धेच्या प्रचारासाठी लॉर्ड्स मैदानावरून ट्रॉफी टूरची सुरुवात करण्यात आली आहे. ही ट्रॉफी विविध देशांत फिरल्यानंतर यजमान इंग्लंडमध्ये दाखल होईल. ही स्पर्धा 12 जूनपासून सुरू होणार असून, खेळाच्या इतिहासात ही आतापर्यंतची सर्वात मोठी महिला क्रिकेट स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे.
आम्ही ठरवलेल्या गोष्टी काम करत नाहीये! कबुली देत हार्दिक पंड्याने सांगितले MI च्या पराभवाचे कारण



























































