असं झालं तर… ‘ईपीएफ’ यूएएन क्रमांक असा मिळवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • तुमची पहिली नोकरी असेल किंवा पहिल्यांदाच ईपीएफ खाते उघडत असाल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ‘यूएएन’ क्रमांक मिळविणे.
  • यूएएन क्रमांक तयार करण्यासाठी ‘उमंग’ या अ‍ॅपचा वापर करावा लागेल. या अ‍ॅपवर ‘आधार’द्वारे फेस ऑथेंटिकेशन वापरून हा क्रमांक मिळेल.
  • उमंग आणि आधार-आधरित फेस ऑथेंटिकेशन अ‍ॅप डाऊनलोड करा. उमंग अ‍ॅपवर सर्वप्रथम ईपीएफओ सेवा विभागात यूएएन अलॉटमेंट आणि ऑक्टिव्हेशनवर क्लिक करा.
  • तेथे आधार क्रमांक टाका. त्यानंतर तुम्हाला पडताळणीसाठी ओटीपी येईल. ओटीपी पडताळणीनंतर तुम्हाला यूएएन क्रमांक मिळेल.
  • हा क्रमांक लिहून घ्या तसेच नीट सेव्ह करून घ्या. हा क्रमांक आवश्यक महत्त्वाचा आहे. भविष्यात नोकरी बदलल्यास हाच क्रमांक प्रत्येक ठिकाणी द्यावा लागेल.