रेल्वेच्या ग्रुप-डी भरतीतील उमेदवारांवर अन्याय, आमरण उपोषणाचा इशारा देत महाव्यवस्थापकांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र आणि परराज्यातील उमेदवार मध्य रेल्वेच्या ‘ग्रुप-डी’ भरती प्रक्रियेत रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार सर्व अटी पूर्ण करून अंतिम परीक्षा, वैद्यकीय चाचणीत पात्र ठरूनही त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवारांनी नियुक्तीची मागणी करीत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रेल्वेच्या ग्रुप-डी भरती प्रक्रियेतील वैद्यकीय परीक्षा पात्र 20 टक्के अतिरिक्त प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना 698 रिक्त जागांसाठी तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच आपल्या मागणीबाबत दहा दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय न घेतल्यास बेमुदत आमरण उपोषण केले जाईल, उपोषणामुळे उमेदवारांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही उमेदवारांनी दिला आहे. ग्रुप-डी भरती प्रक्रियेतील उमेदवार योगेश पाटील यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे.