’व्हॉट्सऍप प्लस’साठी पैसे मोजावे लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सऍप यूजर्ससाठी लवकरच एक नवीन प्रीमियम सबस्क्रिप्शन लाँच केले जाणार आहे. ‘व्हॉट्सऍप प्लस’ असे या फिचरचे नाव असून यासाठी यूजर्सला पैसे द्यावे लागतील. या फिचरमुळे यूजर्सला 18 कस्टम थीम्स, 20 चॅट्स पिन करण्याची सुविधा आणि नवीन आयकॉन्स मिळणार आहेत. ही सेवा व्हॉट्सऍप बिझनेससाठी नसून केवळ वैयक्तिक व्हॉट्सऍप मेसेंजर वापरणाऱयांसाठी असेल. सबस्क्रिप्शन न घेणाऱयांचे सामान्य व्हॉट्सऍप पूर्वीप्रमाणेच विनामूल्य सुरू राहील. ही एक मासिक शुल्कची सेवा असेल.