राहा फ्रेश फ्रेश..! दिवसभराचा कामाचा स्ट्रेस असा करा दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑफिसची कामे पूर्ण करणे आणि वैयक्तिक नातेसंबंध सांभाळणे यामुळे कधीकधी तणावाची पातळी इतकी वाढू शकते की ती असह्य वाटू शकते. अशा परिस्थितीत वैयक्तिक आणि व्यावसायिक संतुलन राखणे कठीण होते. यामुळे तणाव अनेक पटींनी वाढतो. अनेकदा आपल्यासा थकवा, चिंता आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या जाणवतात. मनापासून आनंदी राहण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत काही बदल केले पाहिजेत. जीवनशैलीतील छोटे बदलही मोठा फरक घडवू शकतात. चांगल्या सवयींमुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य हळूहळू सुधारते. या लेखात मानसिक तणाव कमी करण्यास आणि तुम्हाला अधिक आनंदी वाटणाऱ्या मदत करणाऱ्या सवयींबद्दल जाणून घ्या.

फोनपासून दूर राहा

आपण सकाळी उठल्याबरोबर फोनमधील नोटिफिकेशन्स तपासू लागतो. या सवयीमुळे ताण वाढण्याची शक्यता असते. तुम्ही ही सवय मोडून तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सकाळी उठल्यावर १-२ मिनिटे हळूहळू श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. या सरावामुळे तुमचा ताण कमी होतो आणि शरीरातील सुस्तीही दूर होते.

दररोज मेडीटेशन करा

तुमचा दिवस तणावपूर्ण असेल किंवा तुम्हाला विविध गोष्टींमुळे वारंवार तणाव जाणवत असेल, तर तुम्ही दररोज काही मिनिटे मेडीटेशन केले पाहिजे. सुरुवातीला फक्त पाच मिनिटे शांतता पाळून सुरुवात करा. डोळे बंद करा, ताठ बसा आणि हळू श्वास घ्या. या प्रक्रियेमुळे तुमचे मन शांत होण्यास आणि भावनिक गोंधळ कमी होण्यास मदत होईल.

पौष्टीक पदार्थ खा

अन्न केवळ तुमचे पोटच भरत नाही, तर ते तुमच्या शरीरासाठी औषधासारखेही काम करते. पौष्टिक आणि समाधान देणारे पदार्थ खा. जेवताना स्क्रीनपासून दूर राहा आणि प्रत्येक घासाचा आस्वाद घ्या.

स्वत:ला वेळ द्या

दिवसभरात स्वतःसाठी थोडा वेळ बाजूला काढा. हा वेळ ऑप्शनल ठेवू नका उलट, तो वेळ फक्त तुमचाच असेल याची काळजी घ्या. या वेळेत तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता. जसे की स्वतःची काळजी घेणे किंवा स्वतःला काहीतरी भेटवस्तू देणे.