
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बकरी-ईदच्या आठवडाभरापूर्वी नमाज पठणावरून इशारा दिला आहे. रस्त्यावर नमाज पठण करू दिले जाणार नाही. शिफ्टमध्ये नमाज पठण करा. प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर मग बघू, असे योगी म्हणाले. नमाज पठण करायचे तर ते ठरलेल्या ठिकाणी करा. आम्ही नमाज रोखणार नाही, मात्र रस्त्यावर अराजकता खपवून घेणार नाही. रस्ते हे नमाज पठण किंवा कोणत्याही प्रकारे गर्दी गोळा करण्यासाठी नाहीत, असे योगी पुढे म्हणाले. वाहतुकीत अडथळे निर्माण करण्याचा अधिकार कोणाला नाही. सर्वांना सिस्टीमने राहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.





























































