‘डेक्कन’ने अडवली चाकरमान्यांची वाट; शेलू-नेरळ मार्गावर प्रवाशांची सव्वा तास लटकंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेलू नेरळ स्थानकांदरम्यान क्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने ‘डेक्कन ‘ने चाकरमान्यांची बट अडवली. त्यामुळे या मार्गावर लोकल प्रवाशांची सव्वा बस लटकंती झाली. आज सकाळी पावणेआठच्या सुमारास ही टना घडली. आधीच प्रचंड उकाडा आणि त्यात एक्स्प्रेस बंद डून लोकल सेवेचा बोजवारा उडाल्याने प्रवासी हैराण झाले. ऐन दर्दीच्या वेळी झालेल्या या गोंधळामुळे कर्मचाऱ्यांच्या डोस्क्याला ांगलाच ताप झाला. रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक टीमने बिघाड रुस्त करून एक्स्प्रेस पुण्याच्या दिशेने रवाना केली.

नेहमीच कोणत्या ना कोणत्या ारणाने ठप्प होणारी मध्य रेल्वेची कल सेवा पुन्हा एका विस्कळीत बली. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी क्कन एक्स्प्रेस शेलू नेरळ चानकांदरम्यान आली असता अचानक जनमध्ये बिघाड झाला आणि ही क्स्प्रेस दामत गेट परिसरात बंद पडली. ची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तडीने तांत्रिक पथक घटनास्थळी बाना केले. रेल्वे अधिकारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या टीमने दुरुस्तीचे काम हाती घेतले. बिघाड शोधण्यात बराच वेळ गेला. सव्वा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या मेगाहालमुळे डेक्कन एक्स्प्रेससह कर्जत, खोपोली, बदलापूर, वांगणी स्थानकांवर उभ्या असलेल्या लोकलमधील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

मस्टरवर लेटमार्क
कर्जत-खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल बदलापूर रेल्वे स्थानकात रद्द करण्यात आल्या. वांगणी स्थानकावर रेल्वे खोळंबल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी झाली होती. उद्यान एक्स्प्रेससह कर्जत लोकल वांगणी रेल्वे स्थानकात खोळंबल्या होत्या. डाऊन मार्गावरील कर्जत-खोपोलीच्या गाड्या बदलापूर रेल्वे स्थानकातूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना करण्यात आल्या. मात्र मध्य रेल्वेच्या ‘काम बिघाडा’मुळे असंख्य कर्मचाऱ्यांच्या मस्टरवर लेटमार्क लागला.

ट्रॅकला तडे, इंजिन बिघाडाच्या घटना वाढल्या
मध्य रेल्वे मार्गावरील रुळांना तडे जाणे, इंजिनमध्ये बिघाड होणे या घटना गेल्या वर्षभरापासून नेहमी होत आहेत. दर रविवारी दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. त्यावेळी नेमके काय केले जाते, असा सवाल संतप्त प्रवाशांनी केला आहे. ऐन कामावर जायच्या वेळेस रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.