
मुंबईतील कलाप्रेमींसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी जहांगीर आर्ट गॅलरी, काला घोडा येथे मंगळवारी एका भव्य आणि बहुप्रतिक्षित अनुभवात्मक लक्झरी प्रदर्शनाचे अधिकृत उद्घाटन झाले. (सर्व फोटो – गणेश पुराणिक)

प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, यलो ऑर्किड हेरिटेज प्रा. लि.च्या संस्थापक व संचालक भाग्यश्री पानसरे उपस्थित होत्या.

2 जून ते 8 जून दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.

‘यलो ऑर्किड हेरिटेज प्रा. लि.’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष बहुआयामी प्रदर्शनाचे नाव ‘द गोल्ड डायनेस्टी’ असे आहे.

हिंदुस्थानी वारशाच्या समृद्ध कथांना एका नव्या आधुनिक स्वरूपात लोकांसमोर सादर करणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

हे प्रदर्शन ऐतिहासिक कलावैभव आणि आधुनिक अतिआलिशान डिझाईन यांचा एक सुरेख संगम घडवून आणणारे असून, प्रेक्षकांसाठी हा एक अत्यंत वेगळा आणि समृद्ध अनुभव ठरत आहे.

दर्जेदार शिल्पकला, चित्रकला आणि आधुनिक ललित कलाकृतींसोबतच प्रिमीयम हॉट ज्वेलरीची अत्यंत आकर्षक मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली आहे.

प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृती कालातीत सौंदर्य, दुर्मिळ साहित्यसंपदा आणि हिंदुस्थानी कारागिरांच्या अतुलनीय कौशल्याचा गौरव करते.





























































