
सरकारच्या अपयशामुळे महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवार, 4 जून रोजी जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून डिझेल-पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. त्यामुळे सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. जनतेच्या या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. यावेळी विभागातील नागरिक, महिला मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. सकाळी 11 वाजता रत्ना हॉटेलजवळ, एसव्ही रोड, गोरेगाव पश्चिम येथे हे आंदोलन होणार आहे.




























































