
कोकण-गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण-गोवा प्रदेशात 5 जून ते 10 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. मध्य महाराष्ट्रातही 5 जून रोजी तसेच 7 जून ते 10 जून या कालावधीत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह वादळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मौसम संबंधी चेतावनी
मुख्य बिंदु
(i) दक्षिण-पश्चिम मानसून आज, 4 जून 2026 को केरल में प्रवेश कर गया है।
(ii) अगले 7 दिनों के दौरान केरल और कर्नाटक में अलग-अलग स्थानों पर भारी से बहुत भारी वर्षा (7-20 सेमी) होने की प्रबल संभावना है, और तमिलनाडु में भी अलग-अलग स्थानों पर भारी… pic.twitter.com/QcydHYP7CA
— India Meteorological Department (@Indiametdept) June 4, 2026



























































