अल्पवयीन मुलीची प्रसूती; बालकाच्या विक्रीचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बालकाला विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवल्याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात रविवारी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, त्यातील नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यात चार डॉक्टरांचा समावेश आढळल्याने खळबळ उडाली आहे. मालेगावात डॉ. किशोर डांगे यांचे हिराई हॉस्पिटल आहे. ते पूर्वी सामान्य रुग्णालयात अधीक्षक म्हणून कार्यरत होते. 3 जून रोजी त्यांच्या खासगी रुग्णालयात 16 वर्षीय मुलीची सिझेरियन प्रसूती झाली. याबाबतची माहिती त्यांनी पोलीस व आरोग्य प्रशासनाला दिली नाही. वैद्यकीय अटी-शर्थींचे उल्लंघन करून मुलीचे कोणतेही कायदेशीर कागदपत्र तयार न करता तिची प्रसूती करण्यात आली. ओळख लपवण्यासाठी तिला अज्ञात ठिकाणी नेले, बाळाची विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवून घेतले, अशी फिर्याद मालेगाव सामान्य रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांनी रविवारी दिली.