आमदार खरेदीसाठी 50 खोके आहेत, मग आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1-1 कोटी का देत नाही? अभिजीत दीपके यांचा सरकारला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिघडलेल्या शैक्षणिक व्यवस्थेमुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. आमदार खरेदीसाठी सरकारकडे 50 खोके असतात, मग मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1-1 कोटी रुपयांची मदत का दिली जात नाही, असा सवाल कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना केला.

नागपूर येथील संविधान चौकात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने विद्यार्थ्यांच्या विविध गंभीर प्रश्नांवर जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत दीपके यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशात ‘नीट’ आणि इतर स्पर्धा परीक्षांचे पेपर सातत्याने लीक होत असल्याने गरीब आणि कष्टकरी कुटुंबांतील हुशार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले.