
लहान मुलांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी चांदिवलीच्या सफेद पूल परिसरात पंचशील महिला मंडळाच्या माध्यमातून वेदव्यास फ्लेवीज प्री स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. सुभाष गायकवाड व मनाली गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या प्री स्कूलचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले.
यावेळी रवि नायर, अॅड. अमोल मातेले, बाबू बत्तेली, लॉरेन्स बाबा डिसोझा, सुनील जैन, सूर्या गौडा, अॅड. कैलास आगवणे, कृष्णा नलावडे, अजय शुक्ला, उत्तम पोखरकर, हिराचंद सूर्यवंशी, राजू सोनवणे, राजेंद्र कांबळे, जगन्नाथ उडूगडे, अॅड. रेहमान, बंशी सिंह, अजीज खान, मोहसिन शेख, सईद खान, सर्जेराव कांबळे, आदी उपस्थित होते.




























































