वजन घटवलं, कर्मचाऱ्याला 2.5 लाख रुपयांचे बक्षीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वजन कमी केले म्हणून ‘झिरोधा’चे सीईओ नितीन कामत यांनी एका कर्मचाऱ्याला तब्बल अडीच लाख रुपयांचे बक्षीस दिले. याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. नितीन कामत यांनी कर्मचाऱ्यांना वजन कमी करण्याचे चॅलेंज दिले होते. कर्मचाऱ्यांनीही ते स्वीकारले. रोहित अग्रवाल याने वर्षभरात तब्बल 30 किलो वजन घटवून पैज जिंकली. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आणि वजन कमी करण्यासाठी मिळलेली प्रेरणा सर्वात मोठी ठरली, असे रोहित अग्रवाल याने म्हटले. रोहितचे वजन 104 किलो होते. ते तब्बल 74 किलोवर आणले. स्वतः नितीन कामत म्हणाले की, कर्मचाऱ्यासोबत फिटनेसची पैज हरल्याचा मला आनंद होत आहे. त्यावर, पैसे गमावण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.