
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रितने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रकुलने ऑफ शोल्डर इव्हनिंग गाऊन लूक केला आहे. ज्यामध्ये तीने फिकट गुलाबी रंगाचा स्लिट बॉडीकॉन वेअर केला आहे. तसेच केसांना सॉफ्ट वेव्ही लुक दिला आहे. त्यासोबत डायमंडचे कानातले घातले आहेत आणि बोटांमध्ये साध्या पण आकर्षक अशा डायमंडच्या एकापेक्षा जास्त रिंग्स घातल्या आहेत. ज्या या लुकला एक एलिगंट टच देत आहेत. या फोटोमध्ये रकुलचा अतिशय सुंदर, नॅचरल आणि ‘सॉफ्ट ग्लॅम’ लुक पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. एकंदरीत, हा लुक कोणत्याही इव्हेंट किंवा पार्टीसाठी अतिशय योग्य आहे.































































