
कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारच्या काचेवर अचानक दगड कोसळून झालेल्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सत्यता तपासून शासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत स्थगन प्रस्तावाद्वारे केली.
आमदार मिलिंद नार्वेकर म्हणाले, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारच्या काचेवर अचानक दगड पडल्याने एका गाडीची काच तुटली आणि दोन गाड्यांचा अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हे व्हिडीओ वारंवार वृत्तवाहिन्यांवर प्रसारित केले जात आहेत. बाजूच्या गाडीच्या टायरमधून एक दगड उडून हा प्रकार घडल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. या व्हिडीओची सत्यता तपासून यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नार्वेकर यांनी केली.





























































