हे करून पहा- पावसाळ्यात केस खूप गळतात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुमचे केस पा वसा च्या पा ण्या त भि जले, तर घरी आल्या वर लगेच स्वच्छ पा ण्या ने आणि शॅम्पूने केस धुऊन नी ट
वाळवा.

 

पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे केस चिकट होतात, कोंडा वाढतो आणि परिणामी केस गळती मोठय़ा प्रमाणात वाढते.

 

दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांना
लावा आणि 40 मिनिटांनी कोमट पाण्याने केस धुऊन घ्या.

 

एक कांदा किसून त्याचा रस काढून घ्या. हा रस कापसाच्या मदतीने टाळूवर लावा. 30 मिनिटांनंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा .