मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅडमिशन प्रक्रियेला 15 जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील पदवी, पदव्युत्तर आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व महाविद्यालयांनी काटेकोरपणे ही प्रवेश प्रक्रिया 4 ते 15 जुलै या कालावधीत पूर्ण करायची आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करण्याची ही शेवटची संधी असणार आहे. चारही विद्या शाखेतील विविध विषयांचा समावेश असलेली ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमांसाठी https://muugadmission.samarth.edu.in आणि पदव्युत्तर व चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांसाठी https://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.