झेनिथ धबधब्यात अडकलेल्या पर्यटकांना वाचवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खोपोलीतील झेनिथ धबधबा येथे अडकलेल्या पर्यटकांना विहारी ठाकूरवाडी ग्रामस्थांनी मदत करत पाण्याच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले. ग्रामस्थांनी मोठा दोर फेकून अडकलेल्या पर्यटकांची साखळी बनवत त्यांची सुटका केली.

 

४१ शिक्षक-कर्मचाऱ्यांची सुटका
मुसळधार पावसामुळे वसई पूर्वेतील एव्हरशाइन सिटीच्या मधुबन परिसरातील ठाकूर इंद्रासंदेवी पब्लिक स्कूल (टीआयपीएस) आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात पाणी शिरल्याने अडकलेल्या ४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने शनिवारी सकाळी सुखरूप सुटका केली.

 

किल्ल्यावर अडकलेले सहा पर्यटक बचावले
पालघर : जिल्ह्यातील तांदूळवाडी किल्ल्यावर अडकलेल्या सहा पर्यटकांची सफाळा पोलीस आणि बचाव पथकाने सुखरूप सुटका केली. नालासोपारा, विरार आणि डहाणू येथील चार तरुण व दोन तरुणी असे एकूण सहा पर्यटक तांदूळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. किल्ल्यावरून परत खाली उतरत असताना मुसळधार पाऊस, दाट धुके आणि निसरड्या मार्गामुळे त्यांचा रस्ता चुकला.