कोळशाचा ढिगारा खचल्याने ट्रक चालकाचा खाणीत दबून मृत्यू, एकोणा खाणीतील घटना; संतप्त कामगारांचा घेराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेकोली एकोणा कोळसा खाणीत पहाटेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. खाणीत कोळसा भरत असताना अचानक कोळशाचा प्रचंड मोठा ढिगारा खचल्याने, त्याखाली चिरडून एका ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात एकोणा कोळसा खाणीत घडली. या घटनेनंतर संतप्त कामगार संघटनांनी ठिय्या मांडत भरपाई मिळेपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाल आहे. पुष्पेन्द्र सिंग (45) असे मृताचे नाव असून तो मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे. मध्य प्रदेशातून त्याचे नातेवाईक येणार आहेत. त्यानंतर बैठक घेऊन मोबदल्याचा तिढा सोडल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.