
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामसाठी मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याणदरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत तर ट्रान्स हार्बरवर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात ठाणे ते कल्याणदरम्यान सर्व लोकल धिम्या मार्गावर धावणार असून ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे.
मुलुंड स्थानकावर एफओबी गर्डर्सचे काम करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री 1.10 ते पहाटे 3.40 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी रात्री 12.24 वाजता सुटणारी सीएसएमटी-ठाणे लोकल, पहाटे 4.04 वाजता ठाण्याहून सुटणारी सीएसएमटी लोकल रद्द राहणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 12.25 ते रविवारी पहाटे 4.25 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.




























































