बाळासाहेब हेच आपले गुरू आणि दैवत – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर आलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या प्रेमाचा आदरपूर्वक स्वीकार केला. शिवसेनाप्रेमी नागरिक आणि शिवसैनिकांचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. यावेळी प्रत्येक शिवसैनिक आपले लाडके कुटुंबप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यापुढे विनम्रपणे वाकून नमस्कार करीत होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, बाळासाहेब हेच आपल्या सर्वांचे गुरू आणि दैवत आहेत. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊया, शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करूया, त्यांचे ज्वलंत विचार स्मरणात ठेवून कार्य करूया, असे सांगतानाच ‘वाकू नका, तुमचा प्रेमाचा ‘जय महाराष्ट्र’ पुरेसा आहे. तुम्हा सर्वांना निरोगी आयुष्य लाभू दे’, अशी सदिच्छा व्यक्त करीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या गुरुवंदनेचा स्वीकार केला. यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आदराची भावना व्यक्त केली.