
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार, पार्श्वगायक, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज कपूर जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ संवादलेखक सलीम खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
राज्य शासनाने सन 2025 चे हे पुरस्कार आज जाहीर केले. चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी मराठी अभिनेते प्रसाद ओक तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी अभिनेत्री राणी मुखर्जी यांची निवड करण्यात आली आहे.
10 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक असे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. विशेष योगदान पुरस्कार्थींना 3 लाख रुपये रोख, शाल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते.






























































