
दिल्लीत संसदेवरील मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा एक भयंकर व्हिडीओ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या X अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत एक साध्या वेशातील व्यक्ती पोलिसांची दांडी हातात घेऊन आंदोलक विद्यार्थ्याला रस्त्यावर पाडून मारताना दिसत आहे. तो व्हिडीओ शेअर करत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
Such horrendous brutality from the bjp regime.
India is now the largest former democracy in the world, under this regime.
In no democratic country, anywhere in the world, do unarmed students face such brutalities when asking for justice.
The world has been watching the… https://t.co/jZEfIe6ns0
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 30, 2026
”भाजप राजवटीकडून अत्यंत भयानक क्रूरता सुरू आहे. या अशा सत्ताधाऱ्यांमुळे एकेकाळी सर्वात मोठी लोकशाही असलेला हिंदुस्थान आता सर्वात मोठा ‘माजी लोकशाहीवादी’ देश बनला आहे. जगातील कोणत्याही लोकशाही असलेल्या देशात, न्यायाची मागणी करणाऱ्या निशस्त्र विद्यार्थ्यांना अशा क्रूरतेला सामोरे जावे लागत नाही. पण हिंदुस्थानात पेपरफुटीची जबाबदारी घ्या असे सांगणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी भाजपने केलेल्या अमानुष अत्याचाराचे संपूर्ण जग साक्षीदार आहे. या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक असायला हवी. आपल्या देशात लोकशाहीला कशाप्रकारे चिरडलं गेलंय ते सर्वांनी बघितलं आहे. हिंदुस्थानी आता या राजवाटीविरोधात न्याय मागत आहेत” असे आदित्य ठाकरे म्हणाले.



























































