वाचककट्टा – सीमांच्या पलीकडचे सर्जनशील गोत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> तृप्ती कुलकर्णी

संधी शोधणारे अनेक असतात; पण संधी निर्माण करणारे हात मात्र फार थोडे असतात. अशाच एका संधीने माझी ओळख एका आगळ्यावेगळ्या जागतिक UBI या साहित्यिक परिवाराशी करून दिली. मी थोडेफार लेखन करत असल्यामुळे UBI च्या मराठी काव्यमंचाची सूत्रधार शीतल देशपांडेने सहज विचारले, ‘‘मराठी ध्जह श्ग्म् कार्यक्रमात सादरीकरण करशील का?’’ सुरुवातीला तो केवळ एका कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रस्ताव वाटला; पण या मंचाशी जोडले जाताच माझ्यासमोर उलगडत गेली ती कवयित्री सपना शिवानी केकरे यांनी पाहिलेल्या एका विशाल स्वप्नाची गोष्ट. जगभरातील सर्जनशील व्यक्तींना एका समान धाग्यात गुंफण्याची…

2 फेब्रुवारी 2018 रोजी फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी युनायटेड बाय इंक (UBI) या जागतिक सर्जनशील मंचाची स्थापना केली. विविध भाषा, प्रदेश आणि संस्कृतींतील लेखक, कवी, कलाकार आणि सर्जनशील व्यक्तींना एकत्र आणून त्यांना अभिव्यक्तीचे समान व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. आज आठ वर्षांनंतर तो उद्देश एका जागतिक सर्जनशील चळवळीत रूपांतरित झाला आहे. ळँघ् हा केवळ कलाकारांना अभिव्यक्तीची संधी देणारा डिजिटल प्लॅटफॉर्म नाही, तर जगभरातील सर्जनशील व्यक्तींचे एक ‘सर्जनशील गोत्र’ आहे. परिवार अनेक ठिकाणी विखुरलेला असू शकतो, त्याचे उपगट असू शकतात; पण त्या सर्वांना एका समान सर्जनशील धाग्याने जोडणारे गोत्र एकच असते. गेल्या आठ वर्षांत सपना शिवानी केकरे यांच्या नेतृत्वाखाली UBI ने हे मानाचे स्थान प्राप्त केले आहे.

आज सुमारे 60 ते 70 देशांतील दहा हजारांहून अधिक सदस्य या जागतिक परिवाराशी जोडलेले आहेत. UBI तर्फे साहित्यिक, रचनात्मक, कौशल्यविकास आणि सर्जनशीलतेला चालना देणारे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात. UBI Fest, UBI Hindi Utsav DeeefCe UBI Inked Marathon हे वार्षिक कार्यक्रम सदस्यांना एकत्र येण्याची, शिकण्याची आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी देतात. दर पंधरवडय़ाला आयोजिल्या जाणाऱया लेखनस्पर्धांनी सदस्यांची सर्जनशीलता जागृत राहते. आजपर्यंत सदस्यांच्या साहित्याचे सहा ते आठ संकलन ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. लेखकांसाठी स्वतंत्र विनामूल्य ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म (www.unitedbyink.org), Learning Labs Program अंतर्गत साहित्यनिर्मितीचे प्रशिक्षण आणि विविध कौशल्यविकास उपक्रमही सातत्याने राबवले जातात. तसेच संपादन, प्रकाशन, वितरण, विपणन इ. बाबतीत सहकार्य केले जाते.

UBI चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे भाषिक वैविध्य. गेल्या चार वर्षांपासून इंग्रजी, हिंदी, मराठी, पंजाबी, राजस्थानी, मालवी, बंगाली आणि तामीळ अशा विविध भाषांमध्ये नियमित ध्जह श्ग्म् चे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण UBI च्या यूटय़ूब वाहिनीवर होत असल्याने जगभरातील रसिकांना त्याचा आस्वाद घेता येतो. सादरीकरण, संकलन आणि संग्रह ही तिन्ही उद्दिष्टे एकाच माध्यमातून साध्य करणारा हा उपक्रम आहे. या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 27 एप्रिल 2025 रोजी साजरा झालेला 200 वा मेगा ओपन माईक. तब्बल 11 तास 38 मिनिटे 43 सेकंद चाललेल्या या बहुभाषिक, बहुराष्ट्रीय, बहुसांस्कृतिक कार्यक्रमात आठ देशांतील 213 कलाकारांनी पाच भाषांमध्ये आपल्या प्रतिभेचे सादरीकरण करून एक आगळावेगळा विक्रम नोंदवला. या उपक्रमासाठी Longest-compering-in-an-online- livestreamed-variety-show DeeefCe Most-people-participated-in-an-online-livestreamed- variety-show या दोन्ही विभागांत Golden Book of World Records Jej UBI ची नोंद करण्यात आली. ही कामगिरी या मंचाच्या सातत्यपूर्ण, दर्जेदार आणि जागतिक कार्याची महत्त्वपूर्ण दखल आहे. \

साहित्यापुरतेच नव्हे, तर विविध भाषा, संस्कृती आणि देशांतील माणसांना सर्जनशीलतेच्या एका धाग्यात जोडण्याचे कार्य UBI करत आहे. समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करणारे हे ‘सर्जनशील गोत्र’ आज अनेकांसाठी अभिव्यक्तीचे, शिक्षणाचे, संवादाचे आणि जागतिक मैत्रीचे व्यासपीठ ठरले आहे. बदलत्या काळात अशा उपक्रमांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते आणि म्हणूनच UBI चा हा प्रवास केवळ एका संस्थेचा नसून सर्जनशीलतेच्या जागतिक चळवळीचा प्रवास ठरला आहे. अशा या जागतिक यूबीआय परिवारात सहभागी होण्यासाठी आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
[email protected]