
मार्व्हलचा बहुप्रतीक्षित ‘स्पायडरमॅन ः ब्रँड न्यू डे’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला असून याला हिंदुस्थानातही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी 60.60 कोटी तर दुसऱ्या दिवशी 49.35 कोटी असे दोन दिवसांत एकूण 109.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी इंग्रजी 28 कोटी, हिंदी 17 कोटी, तमीळ 2.25 कोटी, तेलुगू 2 कोटी, मल्याळम 0.07 कोटी आणि कन्नड 0.03 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

























































