
जम्मूच्या परिसरात सततच्या पावसामुळे 250 किलोमीटर लांबीचा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग सलग दुसऱया दिवशीही बंद राहिल्याने, शनिवारी जम्मूतील भगवतीनगर बेस पॅम्पवरून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. अधिकाऱयांच्या माहितीनुसार, उधमपूर जिह्यातील महामार्गाच्या लाधा-समरोली पट्टय़ावर दुरुस्तीचे काम सुरू आहे.

























































