कल्याणमध्ये औषध आणण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचे अपहरण, बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औषध खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या बेतुरकरपाडा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पीडित मुलगी आजीसाठी औषध आणण्याचे सांगून घराबाहेर गेली होती. बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने पुटुंबीयांनी नातेवाईक व मैत्रिणींकडे शोध घेतला. मात्र तिचा काहीच तपास लागला नाही. अखेर बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांचे पथक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलीचा शोध घेत आहे.