ट्रेंड – चॅट जीपीटीचा अजब वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकं तंत्रज्ञानाचा कसा वापर करतील याचा काही नेम नाही. एका माणसाने उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिराबाहेर अनेक जोडय़ांच्या ढिगाऱ्यातून हरवलेली चप्पल शोधण्यासाठी चॅट जीपीटीची मदत घेतली आहे. छोटीशी अडचण सोडवण्यासाठी आता AI चा वापर केला जात असल्याबद्दल अनेक जण गमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. @shubhangborkar ने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने चप्पलेचा फोटो काढल्यानंतर, AI चॅटबॉटला आपली हरवलेली चप्पल ओळखण्यास सांगितले आणि त्याला ती चप्पल सापडली. या व्हिडीओला 20 लाखांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. तर अन्य एकाने गमतीने म्हटले, ‘‘ChatGPT ची अवस्था जणू अशी आहे… की त्याला वाटेल माझ्या शक्तींचा चुकीचा वापर झाला आहे.’’