
टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा शुक्रवारी आपला 26 वा वाढदिवस साजरा करत होता. या खासप्रसंगी माजी क्रिकेटपटू आणि त्याचा मार्गदर्शक युवराज सिंगने अभिषेकसाठी एक विशेष संदेश शेअर केला आहे. युवराजने अभिषेकचे कौतुक करत म्हटले की, ‘तो ज्या प्रकारचा माणूस बनला आहे ते कौतुकास्पद आहे. त्याने अभिषेकच्या चुकांमधून शिकण्याच्या आणि कठोर परिश्रम करण्याच्या वृत्तीचेही कौतुक केले.’ युवराजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सामन्यादरम्यान काही खराब फटके खेळल्यानंतर युवराजने अभिषेकला त्याचे कान धरून सिट-अप्स करायला लावले. त्यानंतर अभिषेककडून वचन घेण्यात आले की, तो ती चूक पुन्हा करणार नाही.




























































