टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या आवाजाची चाचणी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अटकेत आरोपींच्या काही व्हॉइस नोट पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. यातील आवाज हा त्याच आरोपींचा आहे का, हे तपासण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने पोलीस घेणार असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याचेही समजते. 18 ऑक्टोबरला सायंकाळी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार करून पळालेल्या फुल सिंग, हृतिक कुमार ऊर्फ रोशन, रेहान अन्सारी यांना राजस्थान येथे पकडले होते. त्यानंतर कुणाल, सुमित, राधा वर्मा, बबिता राव, अंकित खटक, जतीन पांचाळ आणि समीर खत्री यांना अटक करण्यात आली. सर्व आरोपी व्हॉट्सऍप आणि ऍपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. गोळीबाराच्या घटनेनंतर काही आरोपींनी चॅट, व्हॉइस नोट डिलीट केल्याच्या गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे.