परप्रांतीयांकडून वेठबिगारी, 42 मजुरांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊसतोडणीसाठी दररोज 800 रुपये देण्याचे आमिष दाखवून परप्रांतीय मजुरांकडून वेठबिगारी करून घेण्यात येत असल्याच्या धक्कादायक प्रकाराचा परंडा पोलिसांनी पर्दाफाश केला. कैडगाव आणि डोमगाव येथे एकाच वेळी धाड टापून पोलिसांनी 42 मजुरांची या नरकवासातून सुटका केली. हे सर्व मजूर छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश तसेच नेपाळमधील असल्याचे सांगण्यात आले. काwडगाव तसेच डोमगाव येथे काही परप्रांतीय मजुरांना डांबून ठेवण्यात आल्याची माहिती परंडा पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण शिरसट यांनी अगोदर माहितीची खातरजमा केल्यानंतर काwडगाव आणि डोमगाव शिवारात धाड घातली.