राज्यात फक्त 300 चौरस फुटांच्या जागेत कौशल्य विकास केंद्राची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झोपडपट्ट्या तसेच दुर्गम व डोंगराळ भागातील तरुण-तरुणींना काwशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या वतीने केवळ 300 चौरस फुटांच्या जागेत प्रशिक्षण पेंद्र सुरू करण्यात आले आहे.

रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 100 केंद्रांना प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी आज 12 केंद्रांचे उद्घाटन एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्पूलमध्ये झाले. मुंबई, नागपूर, डहाणू, पालघर, नंदुरबार, यवतमाळ, पुणे, सिंधुदुर्ग व जळगाव जिह्यातील या केंंद्रांचे उद्घाटन झाले. नामांकित, सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. स्थानिक संस्था, उद्योग व सरकारच्या समन्वयातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.