
धावपटू शौर्या अंबुरे हिने युवा ऑलिम्पिक गेम्समधील महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली. अत्यंत अटीतटीच्या व रोमांचक झालेल्या या शर्यतीत तिने 13.59 सेपंद अशी विक्रमी वेळ नोंदवत केवळ पदकच जिंकले नाही, तर 13.70 सेपंदांचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. या गटात केई झांग हिने 13.17 सेपंद वेळ देत सोनेरी यश संपादले, तर फ्रान्सची अॅना पीटर्स शौर्यापेक्षा 2 शतांश सेपंद उत्तम वेळ देत दुसरी आली.
पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अविनाश अंबुरे आणि रूपाली अंबुरे यांची ही कन्या असून, घरच्या संस्कारांमधून मिळालेली जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यशाने ठाणे जिह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून संपूर्ण ठाणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.



























































