
सोलापूरच्या विमानतळावर एक प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवरून घसरले. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने विमानातील महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक बचावली. एका खासगी फ्लाइंग क्लबचे हे विमान होते. दुपारी सोलापूर विमानतळावरून उड्डाण घेत असताना वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले. वेग घेत असताना विमान धावपट्टीवरून घसरले. त्यात विमानाचे समोरचे चाक निखळले आणि समोरचा भाग जमिनीत रुतून बसला.



























































