
>> नीलिमा प्रधान
मेष – व्यवहारात सावध रहा
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर, शारीरिक, मानसिक दडपण येईल. प्रकृतीची योग्य काळजी घ्या. व्यवहारात सावध रहा. कायदा पाळा. नात्यात गैरसमज होतील. तणाव जाणवेल. नोकरीत कामाचा व्याप राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव राहील. शुभ दि. 15, 19
वृषभ – रागावर ताबा ठेवा
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर. रागावर ताबा ठेवल्यास अने कामे करून घेता येतील. प्रवासात घाई नको. दुखापत टाळा. नोकरीत वर्चस्व दाखवता येईल. धंद्यात हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शब्द जपून वापरा. वरिष्ठांना समजून घ्या. शुभ दि. 19, 21
मिथुन – चातुर्याने समस्या सोडवा
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर. जवळच्या व्यक्तीची मर्जी राखणे कठीण वाटेल. विचलित न होता चातुर्याने समस्या सोडवा. नोकरीत दगदग होईल. कुणालाही कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. शुभ दि. 8, 12
कर्क – प्रेरणादायक काळ
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर. प्रेरणादायक, उत्साहवर्धक सप्ताह. नोकरीत कठोर शब्द वापरू नका. धंद्यात चर्चेत नम्रता ठेवा. करार कराल. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सारासार विचार करून निर्णय घ्या. दुखापत टाळा. शुभ दि. 20, 21
सिंह – प्रवासात घाई नको
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर, कल्पकता व चातुर्य वाढेल. प्रवासात घाई नको. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीत कामाचा ताण राहील. सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निर्णयाचा उतावळेपणा नको. स्पर्धा करणारे वाढतील. शुभ दि. 18, 19
कन्या – प्रकृतीची काळजी घ्या
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर, क्षेत्र कोणतेही सहनशीलता ठेवा. दुखापत टाळा. प्रकृतीची योग्य प्रकारे काळजी घ्या. मनावर दडपण येईल. धंद्यात सावधपणे वागा. फसगत टाळा. मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता ठेवा. तटस्थ रहा. शुभ दि. 15, 21
तूळ – सहनशीलता ठेवा
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर. क्षुल्लक कारणाने मनावर दडपण येईल. संयम, सहनशीलता ठेवा. नोकरीत सहकारी स्पर्धा करतील. नवीन परिचय विचारांना चालना देणारा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारस्थाने वाढतील. शुभ दि. 18, 19
वृश्चिक – कामाचे कौतुक होईल
स्वराशीत सूर्य राश्यांतर. रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात वाढ होईल. सुधारणा करण्याची संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर होतील. नव्याने कार्यारंभ कराल. शुभ दि. 20, 21
धनु – अहंकार नको
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर. तुम्ही ठरविलेल्या कामात अडचणी येतील. जिद्द ठेवा आणि अहंकार नको. नोकरीत वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा. अपमान करण्याचा प्रयत्न होईल. शुभ दि. 15, 16
मकर – विचारांना चालना मिळेल
वृश्चिकेत सूर्य, विचारांना चालना मिळेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. दौर्यात सावध रहा. आर्थिक लाभ होईल. व्यवहारात सतर्क करा. नोकरीत प्रभाव राहील. वाद कुठेही वाढवू नका. राजकीय, सामाजिक प्रसंगावधान ठेवा. निर्णय घ्या. शुभ दि. 15, 16
कुंभ – नवीन ओळख फसवी ठरेल
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर. जवळच्या व्यक्तीमध्ये नाराजी, गैरसमज होतील. नवीन ओळख फसवी ठरू शकते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. प्रतिष्ठा वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. शुभ दि. 19, 21
मीन – कामाची प्रशंसा होईल
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर fिदलासा देणारे ठरेल. कुणालाही कमी लेखू नका. संवाद साधून प्रश्न सोडवा. अरेरावी नको. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यात वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उलाढाल वाढेल. अचानक बदल होतील. शुभ दि. 20, 21

























































