मुख्यमंत्री कोणासाठी काम करत आहेत? महाराष्ट्राच्या जनतेसाठी की या कंपन्यांसाठी? आदित्य ठाकरे यांचा संपत्प सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमाशंकर कर्जत येथे टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी हजारो झांडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकल्पाला मोठा विरोध होत आहे. हा विरोध असताना देखील सरकारने या प्रकल्पासाठी जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाच गावातील 226 शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या प्रकारावर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री व राज्य सरकारला फटकारले आहे.

”राजवट ह्यांच्या खिशात, आणि आपला सह्याद्री ही त्यांच्याच घशात. वोटचोरीने महाराष्ट्र जिंकलेल्या राजवटीने छत्रपती शिवरायांचा सह्याद्री भाजपाच्या मालकांच्या खिशात टाकण्याचे ठरवले आहे, पण महाराष्ट्रातील प्रत्येक स्वाभिमानी व्यक्ती मावळा बनून याविरुद्ध लढणार. पक्ष फोड, वृक्ष तोड, ही वृत्ती विरुद्ध महाराष्ट्राचे स्वाभिमानी मावळे; असे आता चित्र आहे. बॅटरी स्टोरेजचा पर्याय असताना, मुख्यमंत्री कोणासाठी काम करत आहेत? महाराष्ट्राच्या जनतेसाठी की या कंपन्यांसाठी? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.