
अनेक राज्यस्तरीय पारितोषिकांचा मानकरी असलेला ‘लीलाई’ हा दिवाळी अंक यावेळीदेखील विविध साहित्यिक मेजवानीने रुचकर झाला आहे. प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या विनोदसम्राट रघुवीर खेडकर यांच्यावरील लेख, अरुण घाडीगावकर यांचा ‘गजालीनवाज’ गंगाराम गवाणकर, ऑल्विन परेरा यांचा साहित्यिक फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावरील लेख, किरण येले, प्रा. प्रतिभा सराफ, मेघना साने, एकनाथ आव्हाड, मंगेश विचारे, डॉ. नितीन मोरे यांच्या कथा, प्रवीण दवणे, अशोक बागवे, वीणा चाफेकर, अशोक लोटलीकर, वैजयंतीमाला मदने यांच्या कविता, सॅबी परेरा, जोसेफ
तुस्कानो, चिन्मय गवाणकर, रंजना ठाकूर यांचे ललित लेख, प्रभाकर वाईरकर, प्रशांत कुलकर्णी, संजय मिस्त्राr यांची व्यंगचित्रे, ‘एकाच क्षेत्री… जोडी आमची’ तसेच रिल्स संस्कृतीतील विकृती आणि समाजमन हे परिसंवाद असा भरगच्च मजकूर अंकामध्ये आहे. श्रीहर्ष कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ आकर्षक.
संपादक ः पूजा अनिलराज रोकडे
पृष्ठs ः 202, मूल्य ः 300 रु.
स्टार प्रहार
‘स्टार प्रहार’ दिवाळी अंकात विविध मान्यवरांचे साहित्य आहे. आध्यात्मिक गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या ‘अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोकी’ हा लेख वाचनीय आहे. त्याशिवाय दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावरील सीताराम शेट्टी यांचा लेख, भारती दिलीप सावंत यांचा आली दिवाळी, अनुज केसरकर यांचा मनातील दिवाळी हे लेख आहेत. रुचिरा बेटकर, नरेंद्र हडकर, उमा अनिल देवळे, अजित रुमडे आदींचे साहित्यदेखील अंकात आहे.
संपादक ः प्रशांत दत्ताराम खानोलकर
पृष्ठs ः 60, मूल्य ः 50 रु.
धगधगती मुंबई
या दिवाळी अंकाचे यंदाचे 16वे वर्ष. नेहमीप्रमाणे हाही अंक विविध विषयांनी सजलेला आहे. पर्यावरण, शिक्षण, पाणीटंचाई, गुन्हेगारी, राजकारण, समाजकारण, माध्यमांचे बदलते स्वरूप, तरुणाईसमोरील आव्हाने असे अनेक विषय मान्यवरांनी अंकात हाताळले आहेत. डॉ. गोरखनाथ पोळ यांचा ‘दिवाळीचा खरा प्रवास’, माजी आमदार बाबुराव माने यांचा ‘धारावीचा विकास,’ ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांचा ‘खैरात-जाहिरातप्रेमी अधिकारी,’ खंडुराज गायकवाड यांचा पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्यावरील लेख, भिमराव धुळप यांचा तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भातील लेख, लावणीच्या बदलत्या स्वरूपावरील लेख, अभिनेत्री स्मिता तांबे यांची ओमकार भिमराव धुळप यांनी घेतलेली विशेष मुलाखत असा भरगच्च मजकूर अंकात आहे.
संपादक ः भिमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप
पृष्ठs ः 122, मूल्य ः 200 रु.





























































