
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेत्या माजी महापौर विशाखा राऊत, उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनिल शिंदे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार डॉ. राहुल पाटील आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.


































































