असं झालं तर… पेन्शन रखडलीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारी पेन्शनधारकांसाठी पेन्शन वितरक संस्थेकडे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2026 रोजी संपणार आहे. केवळ 2 दिवस शिल्लक आहेत..

जर पेन्शनधारक चालण्यात सक्षम असेल तर त्यांच्यासाठी बँकेत जाऊन प्रमाणपत्र तयार करणे सोपे आहे. शारीरिकदृष्टय़ा थकलेल्या पेन्शनधारकांसाठी घरपोच सुविधेची सोय आहे.

बँकेत जाऊन, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून किंवा घरबसल्या ऑनलाईनदेखील जीवन प्रमाणपत्र तयार करता येऊ शकते तसेच पेन्शन वितरक संस्थेकडे जमाही करता येऊ शकते.

पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी भेट देऊन जीवन प्रमाणपत्र तयार करून घेतो. कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. प्रमाणपत्रासाठी पेन्शनधारकाला 70 रुपये शुल्क भरावे लागते.

घरबसल्या जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पेन्शनधारकांनी जीवन प्रमाण किंवा आधार फेस आरडी या दोन
ऍप्लीकेशनचा उपभोग घ्यावा.