
श्री साईबाबा मित्र मंडळ आणि कासवकर फाऊंडेशन यांच्या वतीने कांदिवली येथील गणपती विसर्जन तलाव परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘गंध स्वरांचे’ या सांगीतिक सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. अशोक कासवकर आणि त्यांची कन्या पूजा मन्वाचार्या यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक हिमांशू पारखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.























































