
शरीर निरोगी राहण्यासाठी आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणूनच उत्तम आहार हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मानली जाते. आपल्या जेवणामध्ये दही दुधाचा समावेश असणे हे निरोगी राहण्याचे लक्षण आहे. दही म्हणजे प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत्र. दह्यामध्ये बी-6 आणि बी-12 यांचे प्रमाण खूप असते. यामुळेच आपल्याला गॅस आणि अपचन या समस्यांपासून सुटका होते. दही पचनक्रिया सुधारण्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय आहे. दह्यामुळे आपल्या तोंडातील अल्सर बरे होण्यास मदत होते. दह्यामुळेच आपला रक्तदाब नियंत्रित राहतो. दुधापासून तयार होणारे अनेक पदार्थ आहे. त्यातले दही हे आपल्या घरात रोज असते.
हिवाळ्यात तुमच्याही पायांना भेगा पडल्यात का, करुन बघा हे उपाय
दही रोजच्या आहारात असणे म्हणजे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. दही आपल्या शरीरामध्ये अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. यामुळेच झोप न येण्याची तक्रारही दूर होते. दही आहारात आपण अनेक प्रकारे आहारात समाविष्ट करु शकतो.
आपण नुसते दही खाऊ शकतो. किंवा दह्यापासून कढी, ताक असे विविध प्रकारही आपण करु शकतो. यामुळे दही आपल्या पोटात जाण्यासही मदत होते. दही वापरुन आपण अनेक प्रकारच्या कोशींबिरी करु शकतो. तसेच नुसते साखर घालूनही दही खाण्याची एक वेगळीच मजा आहे.
शाकाहारी लोकांमध्ये B12 ची कमतरता; 47 टक्के हिंदुस्थानींना जाणवतो थकवा, जाणून घ्या कारण…
आता दही खाण्यासोबत केसांनाही अतिशय पोषक आहे. केसांना दही लावल्यामुळे एक अनोखी चकाकी केसांना प्राप्त होते. म्हणूनच अनेकदा मेहंदी भिजवताना ती दह्यामध्ये भिजवली जाते. केसांना दही लावल्यामुळे कोंडा नष्ट होण्यास मदत होते. तसेच केसांना उत्तम चकाकीही येते. दही लावल्यामुळे केसही मुलायम होतात.

























































