
सामना ऑनलाईन । मुंबई
पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे पूल दुर्घटना घडली आहे. कालव्यावरून जाणारा पूल शुक्रवारी सकाळी कोसळला. यावेळी पूलावरून मालवाहतूक करणारा एक ट्रकही अडकून पडला आहे.
A canal bridge in Siliguri’s Phansidewa collapsed early morning today. More details awaited. #WestBengal pic.twitter.com/pb542LHdqj
— ANI (@ANI) September 7, 2018
दरम्यान, या आधी मंगळवारी दक्षिण कोलकाता येथील माजेर घाट पूल कोसळून एकाचा मृत्यू झाला होता तर 22 जण जखमी झाले होते. या पूल दुर्घटनेच्या नंतर अवघ्या दोन दिवसात ही दुसरी घटना समोर आली आहे.

























































