कोलकात्यात 50 वर्षांचा जुना पूल कोसळला; एक ठार, 22 जखमी

13

सामना ऑनलाईन । कोलकाता

दक्षिण कोलकाता येथील माजेर घाट पुलाचा काही भाग कोसळला. रहदारीच्या वेळीस सायंकाळी 4.45 वाजता ही दुर्घटना घडली. यात एकाचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत. अनेकजण ढिगाऱयाखाली दबले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. शेकडो वाहनांचा ढिगाऱयाखाली चुराडा झाला आहे.

माजेरघाट रेल्वे स्टेशन आणि बेहाला परिसराला जोडणारा 40 वर्षे जुना हा पूल आहे. नेहमीच या पुलावर वाहनांची गर्दी असते. आज सायंकाळी कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने मोठी गर्दी होती. पुलाचा काही भाग कोसळताच हाहाकार उडाला. अग्निशमन दल, पोलिसांनी बचावकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत 25 जणांना ढिगाऱयाखालून सुखरूप बाहेर काढले असून, रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे.

उच्चस्तरीय चौकशी करणार – ममता बॅनर्जी
पूल दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल. सध्या बचाव आणि मदतकार्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या