फार्म हाऊसवर सुरू होता ड्रग्जचा कारखाना; पालघर जिल्ह्यात उडाली खळबळ, वसईतून एक अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर, नाशिक, संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यात देखील खळबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना असल्याचं उघड झालं आहे. मिराभाईंदर गुन्हे शाखेनं या ड्रग्जच्या कारखान्यावर कारवाई केल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

ही कारवाई करताना अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. स्थानिक पोलिसांकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नव्हती.

एका फार्म हाऊसवर हा कारखाना चालू असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका आरोपीला वसई मधून अटक करण्यात आली.