
सामना प्रतिनिधी, मुंबई
‘मोक्का’मध्ये अटक झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणारा सराईत चोरटा नवघर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. बशीर शेख ऊर्फ जम्मू (51) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, चेन तसेच गुह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा सोनसाखळी चोरणाऱ्या बशीरविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर गेल्या शुक्रवारी बशीर शेख नवघर पोलिसांच्या हाती लागला. बशीरने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सोनसाखळ्या चोरल्याचे समोर आले आहे. बशीरविरोधात सोनसाखळी चोरीचे 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पूर्व प्रादेशिक विगातील पोलीस अधिकाऱयांनी एकत्र होऊन आज आंबिवली येथील इराणी वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन केले तेव्हा समीर सिराज सय्यद (26) आणि मोहमद फैयाज इराणी (28) या दोघा सोनसाखळीचोरांना अटक केली आहे.
summary- a history sheeter found as a fled mocca accuse


























































