
सामना ऑनलाईन । जयपूर
हल्ली साधुसंतांवर सातत्याने बलात्कार व छेडछाडीचे आरोप होत आहेत. यामुळे व्यथित झालेल्या एका साधुने स्वत:चे लिंगच छाटल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जयपूर येथे घडली आहे. अनिल पुरोहित ( ४०) असे त्याचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लैंगित अत्याचार प्रकरणात साधु-संत व महात्म्यांची नावे येऊ लागली आहेत. यामुळे लोकांचा साधुसंतावरचा विश्वास उडाला आहे. वृतपत्र व वृत्तवाहिन्यांवरही याच बातम्या येत आहेत. यामुळे जयपूरमधील सेवागिरी धाममधील साधु अनिल पुरोहित कंटाळले होते. साधु-संतांची होत असणारी बदनामी बघून ते व्यथित झाले होते. शुक्रवारी रात्री ते आपल्या खोलीत गेले व त्यांनी आपले लिंगच छाटून टाकले. त्यानंतर शिष्यांनी त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

























































