भाजप मंत्र्यांच्या महिला पीआरओने जीवन संपवले, पोलिसांना मोठा संशय

भाजप मंत्र्याच्या जनसंपर्क विभागातील महिला असिस्टंट डायरेक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पूजा थापक असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. दरम्यान पूजाने आत्महत्या का केली याबाबत अद्याप खुलासा होऊ शकला नाही. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ग्रामीण मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या पीआरओने अज्ञात कारणातून काल मध्यरात्री जीवन संपवले.

‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार, पूजाचा तिच्या पतीशी वाद झाला होता. पूजाचा पतीही सहायक संचालक स्तरावरील अधिकारी आहे. पूजा भोपाळच्या साकेत नगर परिसरात कुटुंबासोबत राहत होती. पूजाचा विवाह 2022 मध्ये झाला होता. तिला एक मुलगादेखील आहे.

पती-पत्नीमध्ये नक्की कोणत्या कारणातून वाद झाला याबाबत स्पष्ट कळू शकले नाही. गोविंदपुरा पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.